Wednesday 26 August 2015

कविता

कविता

मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली 
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली                           

कविता जणू वाटत होती एखांदया  तान्ह्या  बाळासारखी 
नुकतीच या अनोळखी जगात पाउस  ठेवलेली 
आपल्या अस्तित्वाचा शोध घेणारी .......  

मग वाटू लागली ती एखांदया नववधुसारखी
थोडीशी बावरलेली थोडीशी संकोचलेली 
आपण लोकांना आवडू की नाही या विचारत रमलेली  

कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणीसारखी
आपल्या सुरवात व दू :खात सहभागी घेणारी
आपल्या भावना समजुन घेणारी!

शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वत:च   व्यक्तिमत्व 
ती ही शोधत असते सगळ्यामध्ये आपलं वेगळ अस्तित्व !!!   

No comments:

Post a Comment