Wednesday 2 September 2015

या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे ॥

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा दिल्लिवर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव 'हवा' पाहिजे
'हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे
म्हनुनच" राजे... पुन्हा जन्म घ्या"!!पुन्हा जन्म घ्या"!!शिवाजिं च्या जन्मनंतर.. देशाभिमानाचे आणि स्वाभिमानाचे एक बिज ह्याच माती मद्धे रुजले ,इथल्या वारयाने ते झेललं ,इथल्या गवता च्या पात्या वर ते फुकलं ,आणि त्याच गवताच्या पात्याचे आज भाले झाले आहेत ...
आपला बाप कोण आसेल हे आपल्या हतात नसते पण् आपण कुणाचे बाप व्हावे हे मात्र आपल्याच हतात आसते

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव 'हवा' पाहिजे
'हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

"या देशाला जिजाऊ चा शिवा पाहिजे ".............शिवशाही च्या भक्तानो !ही वेळ असे भक्तिची, मावळ च्या अभिमान्यनो!ही घटिका अ

Wednesday 26 August 2015

कविता

कविता

मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली 
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली                           

कविता जणू वाटत होती एखांदया  तान्ह्या  बाळासारखी 
नुकतीच या अनोळखी जगात पाउस  ठेवलेली 
आपल्या अस्तित्वाचा शोध घेणारी .......  

मग वाटू लागली ती एखांदया नववधुसारखी
थोडीशी बावरलेली थोडीशी संकोचलेली 
आपण लोकांना आवडू की नाही या विचारत रमलेली  

कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणीसारखी
आपल्या सुरवात व दू :खात सहभागी घेणारी
आपल्या भावना समजुन घेणारी!

शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वत:च   व्यक्तिमत्व 
ती ही शोधत असते सगळ्यामध्ये आपलं वेगळ अस्तित्व !!!   

Tuesday 18 August 2015

होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खूप प्रेम करायचा,
तिची आठवण आल्यावर
कविता करत बसायचा......!

कधी तिच्या केसवर फिदा
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा
कधी तिच्या ओठावर अडकायचा
तर कधी गालावर गोड हसू आणायचा.........!

नेहमी काहीना काही उपमा द्यायचा 
आज परी तर उद्या सरी ....!
प्रेम फक्त तोच करतो असं काही वागायचा

पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना 
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा 
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र द्यायचा 

कविता तिला आवडली कि  वही मागे चेहरा लपवून गोड हसायची

पण कविता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा ......!
आज नाही त्याच्या आयुष्यात ती
तरी कविता करतोय ........!

Saturday 15 August 2015

काही ओळी फक्त आपल्या मैत्रीसाठी ...

काही ओळी फक्त आपल्या मैत्रीसाठी ...


काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भरून टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटत.....

Thursday 13 August 2015

जीवनापासून या, आता..........

जीवनापासून या, आता मला मुक्ती मिळावी
पूर्तता माझ्या व्यथेची, माझिया मृत्यूत व्हावी,
जीवनापासून या आता मला मुक्ती मिळावी.

वेदनेला अंत नाही, अन् कुणाला खंत नाही
गांजलेल्या वासनेची बंधने सारी तुटावी

संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापले माझे पंख लोचने आता मिटावी.

सोबती काही जीवाचे, मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली, चिता माझी जळावी,

काय मी सांगू तुम्हाला, काय बोलू तुमच्याशी
राख मी झाल्यावर, गीते तुम्हाला माझी स्मरावी.......!!!